दहिसर रेल्वेस्थानकावर पोलिसाने पाठलाग करत चोराला पकडले; घटना सीसीटीव्हीत कैद - Dahisar railway station thief
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दहिसर रेल्वेस्थानकावर पोलीस हवालदाराने चोराला पकडल्याची घटना घडली आहे. दहिसर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्रीकांत देशपांडे हे 8 नोव्हेंबर रोजी ड्युटी संपल्यानंतर दहिसर रेल्वे स्थानकावर थांबले होते. तेवढ्यात एका मुलाने चालत्या रेल्वेतून उडी मारली आणि रेल्वे रुळाच्या दिशेने पळू लागला. यावेळी एका महिलेने चोर चोर आवाज देण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून देशपांडे त्या मुलाच्या मागे धावले आणि रेल्वे रुळावर त्याला पकडले. ही घटना रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. श्रीकांत देशपांडे यांनी आरोपीला पकडून त्यास बोरिवली जीआरपीच्या ताब्यात दिले आहे. आरोपी महिलेचा मोबाईल हिसकावून चालत्या ट्रेनमधून पळून जात असल्याचे तपासात समोर आले आहे.