महावितरणने वीज कनेक्शन कापल्याने माणगावात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अनर्थ टळला
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - महावितरणने पूर्व कल्पना व नोटीस न देता घरातील वीज कनेक्शन बंद केल्याने एका व्यक्तीने महावितरणच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. हातकणंगले तालुक्यातल्या माणगाव गावातील एका महावितरण उपकेंद्रा समोरही शुक्रवारी ही घटना घडली. संतोष राजमाने असे त्या आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. राजमाने यांनी महावितरणच्या कार्यालयाच्या दारातच स्वतः वर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच महावितरणचे कर्मचारी आणि गावातील सरपंच उपसरपंच घटनास्थळी पोहोचल्याने दुर्घटना टळली.
कल्पना न देता वीज कनेक्शन बंद केल्याचा संबंधित व्यक्तीचा आरोप -
माणगाव गावातील संतोष राजमाने यांनी त्यांचे वीज बिल भरले नसल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरातील वीज कनेक्शन बंद केले होते. मात्र महावितरण कंपनीने याबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती किंव्हा नोटीस सुद्धा दिली नाही. तरीही अचानक वीज कनेक्शन बंद केल्याने संतापलेल्या राजमाने यांनी थेट गावातील महावितरणच्या उपकेंद्रावर जाऊन जाब विचारत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊन मुळे आधीच आर्थिक संकटात त्यात महावितरणची वाढलेली बिले सामान्य नागरिक कसे भरणार असा सवाल सुद्धा राजमाने याने केला.