पिकविमा कंपन्यांच्या अटी जाचक - राजेश टोपे - पालकमंत्री राजेश टोपे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13028599-thumbnail-3x2-jalna.jpg)
जालना - जिल्ह्यामध्ये मागील पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु, पिक विमा कंपनीच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अडचण येत आहे. केवळ 72 तासांच्या आत पिक विम्यासाठी कंपन्यांना माहिती देणे शक्य होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवा पेच उभा राहिला आहे. पिकांच्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करावी लागणार असून हे अट किचकट असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. दरम्यान पालकमंत्री राजेश टोपे यांनी विमा कंपन्यांच्या या अटी जाचक आहेत. परंतु, पीकविमा कंपनीशी तसा करार झालेला असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा कंपन्यांना माहिती द्यावी असे टोपे यांनी म्हटले आहे. पीकविमा कंपनीकडे 72 तासांत तक्रार करता यावी यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.