VIDEO : वयोवृद्धांना लुटणाऱ्या आई-मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - वयोवृद्धांना लुटणाऱ्या टोळीला बेड्या
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईत पश्चिम उपनगरांमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना निर्जन रस्त्याववरून जाणाऱ्या वयोवृद्धांना जाळ्यात अडकवून फसवणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात फसवणूक करून लुटणाऱ्या आई आणि मुलाला चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्धाचे सोन्याचे दागिने आणि पैसे लुटून हे माय-लेक पसार होत होती. पंकज किशन पटेल आणि आई गीता किशन पटेल असे आरोपींचे नाव आहेत. दोन्ही आरोपी हे मीरारोड येथे राहणारे असून मुंबई उपनगरांमध्ये ते कार घेऊन फिरत असतात. रस्त्यात एखादा ज्येष्ठ नागरिक दिसला, की त्याच्याशी प्रेमाने गप्पा मारायच्या, त्यांना निर्जनस्थळी रस्त्यावर नेऊन त्यांच्या गळ्यातील चेन आणि पैसे घेऊन फरार व्हायचे. अखेर पोलिसांनी या माय- लेकाला अटक केली आहे.