गणेश जयंती; दगडूशेठ हलवाई मंदिरात गणेशोत्सव, भाविकांच्या रांगा - मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दगडूशेठ गणपती मंदिर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे. फुले तसेच रोषणाईने मंदिर उजळून गेले असून पहाटे चार ते सहा या वेळात प्रसिद्ध गायिका मधुरा दातार यांनी श्रींच्या मंदिरात आपली गायन सेवा सादर केली. शास्त्रीय गायनासह भक्तीगीत सादर करुन त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर गणेश याग, गणेश जन्म सोहळा, मंगल आरती, श्रींची पालखीतून नगर प्रदक्षिणा अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते.
Last Updated : Feb 19, 2019, 2:04 PM IST