पुण्यात गणेश भक्ताने काढली गणपतीची ड्रोनवरून मिरवणूक - पुणे न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शहरात यंदा गणरायाचे आगमण हे जरी ढोल ताशाच्या गजरात होत नसले तरी सर्वत्र गणपतीचे आगमण मोठ्या उत्साहात भक्तांनी केले आहे. असाच एका पुण्यातील गणेश भक्तांने गणपती बाप्पांची मिरवणूक ही चक्क ड्रोनवरून काढली आहे. पुण्यात गणेशोत्सवाला विशेष अशी संस्कृती आहे. सर्वत्र बाप्पाचे आगमण झाले आहे. अशावेळी आपल्या गणपती बाप्पांसाठी नेमका नवीन काय करावे या उद्देशाने प्रत्येक जण वेगवेगळे डेकोरेशन वेगळी सजावट करत असतो. मात्र या एका गणेश भक्ताने चक्क ड्रोनवरूनच गणपती बाप्पांची मिरवणूक काढली होती.