आंबेगाव तालुक्यात शंखी गोगलगायींचा वाढला प्रादुर्भाव; शेतकरी संकटात - आंबेगाव पुणे लेटेस्ट
🎬 Watch Now: Feature Video
आंबेगाव/पुणे - तालुक्यातील पूर्व भागातील वैदवादी परिसरात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव आढळल्याने पिकांना धोका निमार्ण झाला आहे. ही शंखी गोगलगाय आकाराने मोठी असून, ती कमी वेळात शेतातील पिके फस्त करते. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी भेट देऊन संबंधित शेतकऱ्यांना काय उपाय योजना कराव्यात यासंबंधी माहिती दिली. शंकी गोगलगायमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. त्यामुळे लवकरात लवकर उपयोजना करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.