कोल्हापुरात मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे आगमन - ganeshotsav 2021

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 10, 2021, 10:18 PM IST

कोल्हापूर - दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात आपल्या कुंभारगल्लीसहलाडक्या बाप्पाचं स्वागत केले आहे. येथील बापट कॅम्प आदी ठिकाणी भाविक सकाळपासूनच बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी दाखल झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवार रात्रीपासूनच कोल्हापूरकरांनी गणेश मूर्ती घरी घेऊन जायला सुरुवात केली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळी सर्वच ठिकाणी अगदी तुरळक गर्दी पाहायला मिळाली. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर नियमांचे पालन करताना सुद्धा पाहायला मिळाले. दरवर्षी उत्साहात तसेच धूम धडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो. मात्र कोरोनामुळे काही बंधने असल्याने तशा पद्धतीने साजरा होत नाही. त्यामुळे लवकरच कोरोनाचे संकट लवकर निघावे जावे अशी प्रार्थना गणेश भक्तांनी केली आहे. याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.