VIDEO : नागपुरात संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले - नागपूर ब्रेकिंग
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12640994-995-12640994-1627817679531.jpg)
नागपूरच्या संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर येऊन आपआपसात भिडले होते. स्थानिक काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई, बेरोजगारी विरोधात काढलेली बाईक रॅली संघ मुख्यालयाजवळून नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचे प्रयत्न केला. मात्र काँग्रेस कार्यकर्ते त्या अरुंद गल्लीतून रॅली नेण्यावर अडून राहिल्यामुळे तिथे तणाव निर्माण होऊन शाब्दिक वादावादी आणि धक्काबुक्की झाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा वाद थांबवला.