Exclusive: एसटीचे आंदोलन भाजपकडून हायजॅक; काँग्रेसचा आरोप - एसटी महामंडळ प्रश्न
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महागाई भत्ता 28 टक्के आणि घर भत्त्यात वाढ केल्याने कामगार संयुक्त कृती समितीने आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या मुख्य मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. ऐन दिवाळीत सुरू असलेले एसटीचे आंदोलन भाजपने हायजॅक केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. एसटी कामगारांच्या भावनेच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Last Updated : Nov 3, 2021, 5:52 PM IST