चिखलीतील पूरग्रस्तांना मिळाले नवे गावठाण.. परंतु स्थलांतरास नागरिकांचा प्रतिसाद नाहीच - कोल्हापूर लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12607101-thumbnail-3x2-a.jpg)
कोल्हापूर - यावर्षी सुद्धा कोल्हापुरात महापुरामुळे आंबेवाडी आणि चिखली गावातील नागरिकांना महापुराचा मोठा फटका बसला. 2019 मध्ये गावातील अनेकांची घरं कोसळली अनेकांची जणावरं वाहून गेली. यापूर्वी सुद्धा या दोन्ही गावांमध्ये मोठं नुकसान झाले होते. त्यामुळे इथल्या रहिवाशांना कायमस्वरूपी स्थलांतर करण्यासाठी जागा देण्यात आल्या आहेत. प्रत्येकवेळी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते मग तरी सुद्धा इथले नागरिक स्थलांतर का करत नाहीत, याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...