मुंबई-पुणे महामार्गावर कार पडली विहिरीत; पाहा व्हिडिओ - मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
🎬 Watch Now: Feature Video
खालापूर (रायगड) - मुंबई-पुणे महामार्गावर मॅजिक पॉईंट येथे बलिनो कारचे ब्रेकडाऊन झाले होते. यावेळी त्यांनी कार चालक चेतन किसन परदेशी यांनी कार पार्क केली होती. यावेळी ते कार रिव्हर्स करत असताना त्यांची कार रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या खोल विहिरीत जाऊन पडली. दरम्यान ते कारमधून खाली उतरले. कारमध्ये अन् कोणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर अपघाताची मालिका थांबता थांबेना झाली असून दररोज असंख्य लहान मोठे अपघात या मार्गावर होत आहेत. त्यामुळे या मार्गावरचे काही किलोमीटरचे अंतर हे अपघाती क्षेत्र म्हणून ओळखले जात आहे.