अभिनेत्री सोनालीच्या घरी बाल गणेशाचे आगमन - बाल गणेशाचे आगमन
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड - मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी च्या निगडी येथील घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. यावर्षी तिच्यासाठी गणपती उत्सव हा विशेष असून लग्नानंतर पहिल्यांदाच हा उत्सव साजरा होत असल्याने सोनाली आनंदी आहे. यावर्षी सोनाली ने बालगणेशाची मूर्ती ची प्रतिष्ठापना केली आहे. यावर्षी सोनालीचा विवाह झालेला असून ती निगडी येथे येणार की नाही असा प्रश्न होता. परंतु, कुलकर्णी घराण्यात तब्बल आजोबा, वडील अशी 50 वर्षाची गणेशोत्सवाची परंपरा असल्याचं सांगत अतुल भाऊ आणि सोनाली कुलकर्णी ही परंपरा पुढे घेऊन जात असल्याचा ती म्हणाली. पुढच्या वर्षी कोरोनामुक्त गणेशोत्सव साजरा करता यावा अशी प्रार्थना तिने बाप्पा चरणी व्यक्त केली आहे. तसेच, विवाहनंतर पहिलाच गणेशोत्सव असल्याने खास असल्याचं ती म्हणाली. भाऊ अतुल हा शाडूच्या मातीपासून दरवर्षी बाप्पाचं वेगवेगळ रूप साकारत असतो त्याला रंगरंगोटी करण्याचं काम सोनाली करते अस ती आवर्जून सांगते.