VIDEO : मुंबईत टोळक्याकडून भरदिवसा वकिलावर तलवारीने हल्ला, पाहा थरार - वकिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
🎬 Watch Now: Feature Video
भरदिवसा मुंबईतल्या बोरिवली परिसरात एका वकिलावर काही जणांनी तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ जुलै रोजी ही घटना आहे. घडलेला प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उस्मानाबाद येथे एका वकिलावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतला हा हल्ला म्हणजे वकिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह करणारा आहे.
Last Updated : Jul 19, 2021, 4:28 PM IST