अमरावती हिंसाचारात फोटोग्राफरची माणूसकी; जखमींना नेले होते रुग्णालयात - अमरावती हिंसा फोटोग्राफर सईद

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 27, 2021, 4:16 PM IST

अमरावती - अमरावतीत १३ तारखेला झालेल्या हिंसाचारात दोन्ही गटांतील उपद्रवी घटक दगडफेक करून एकमेकांना ठार मारण्याच्या नादात होते. त्यावेळी अमरावती शहरातील प्रेस फोटोग्राफर सईद खान ( Press photographer Saeed Khan ) यांनी माणूसकीचे दर्शन दाखवत दगडफेकीत जखमी झालेल्या नागरिकांना आपल्या अंगावर उचलून पोलीस व्हॅनमध्ये टाकून रुग्णालयात नेले. जखमी झालेला व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, हे न पाहता सईद खान यांनी जखमींवर वेळीच उपचार केले. बंधुभावाचा आदर्श घालून समाजात एकतेचा संदेश देणाऱ्या सईद खानचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. ते एका जखमी व्यक्तीला खांद्यावरून रुग्णालयात नेत ( Amravati press photographer save people ) असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सईद यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.