अहमदनगर रुग्णालय आग : टोपेंसह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - भातखळकर - टोपेंसह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - भातखळकर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : अहमदनगर शासकीय रुग्णालयातील दुर्घटना हे महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूत लागलेल्या आगीत ११ रुग्णांच्या झालेल्या मृत्यूला सरकार जबाबदार असून आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड असल्याची टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. भंडारा येथे शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीची चौकशी करणाऱ्या समितीने अहवाल सादर करून १० महिने उलटले तरीही सरकारने त्यातील एकाही सूचनेची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
TAGGED:
अहमदनगर रुग्णालय आग