पिंपरीत चाललंय काय? पिस्तूलाचा धाक दाखवून दोन ठिकाणी खंडणीची मागणी - सीसीटीव्ही खंडणी गुन्हा
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड ( पुणे) - पोलीस आयुक्तालयात देवा जमादार नावाच्या ( Deva Jamadar extortion ) गुंडाने थेट पिस्तूलाचा धाक दाखवून एका महिलेला आणि दुकानदाराला खंडणी मागितल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणी देहूरोड आणि तळेगाव पोलीस ठाण्यात ( Dehurod Talegaon Police station ) देवा जमादार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 48 वर्षीय महिलेने देहूरोड आणि दिनेश मांगीलाल चौधरी याने तळेगाव पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान, पिस्तुल दाखवून खंडणी मागितल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली ( CCTV catches Extortion crime incident ) आहे. या प्रकरणी तळेगाव आणि देहूरोड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. हा गुन्हा ( Pimpari Chinchwad crime news ) दिनांक 10 जानेवारी रोजी घडली आहे.