MP Tatkare On BJP : भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम किती बेगडी आहे हे दिसले - खा. तटकरे - खासदार सुनील तटकरे
🎬 Watch Now: Feature Video
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असे वक्तव्य केले आहे. यावरुन आता नवा वाद रंगत आहे. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतिने खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी निषेध केला आहे. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर सर्वच शिवप्रेमींनी निषेध करायला हवा असे सांगताना त्यांनी भाजपचे महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम किती बेगडी (BJP's love for Chhatrapati Shivaji Maharaj is spurious) हे पहायला मिळाले अशी टिका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST