Gulabrao Patil Resolution 2022 : 'जल संजीवनी योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करणे हाच संकल्प'
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - प्रत्येक घरात स्वच्छ पाणी देणे, हे आमचे उद्दिष्ट आणि ब्रीदवाक्य आहे. जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून आम्ही राज्यातल्या प्रत्येक घरात वाडे वस्त्यांवर स्वच्छ पाणी कसे पुरवता येईल, याचा प्रयत्न करत आहोत. नवीन वर्षातील हाच आमचा संकल्प असणार आहे. त्यामुळे दर माणसी 40 लिटर पाण्याची जी नियमावली आता 55 लिटर प्रति माणसी करण्यात आलेली आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाला 55 लिटर पाणी कसे करता येईल, यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. त्याचप्रमाणे रखडलेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावून जल संजीवनी योजना अतिशय चांगल्या पद्धतीने कशी कार्यान्वित राहील, याकडे नव्या वर्षात आमचा भर असणार आहे, असा संकल्प पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केला आहे.