मास्क न घातल्याने पोलिसांची मारहाण, व्हिडिओ व्हायरल - Police beaten man in Godda
🎬 Watch Now: Feature Video
रांची - मास्क न घातल्याने पोलिसांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील ही घटना आहे. पंकज तांती नामक एक व्यक्ती आपल्या मुलीवर उपचार करण्यासाठी एका रुग्णालयात आले होते. मात्र, दोघांनीही मास्क घातले नसल्याने डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला होता. मास्क घालण्यास डॉक्टरांनी अनेक वेळा सांगूनही ऐकत नसल्याने पोलिसांना बोलाविले होते. यावेळी पोलिसांनी व्यक्तीस मारहाण केली.