दिव्यांग प्रवाशांच्या हक्कासाठी लढणाऱ्या 'विवेक'ची कहाणी एकदा ऐकाच - विवेक जोशी
🎬 Watch Now: Feature Video
जालंधर (पंजाब) : अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी माणसं समाजात फार कमी आहेत. यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे विवेक जोशी. त्यांनी विमानतळावर दिव्यांग लोकांना आवश्यक त्या सुविधा मिळवून देण्यासाठी आवाज उठवला. शारीरिक समस्येमुळे विवेक यांना चालणं-बोलणंही कठीण जातं. मात्र, अशा परिस्थितही हार न मानता त्यांनी एलएलबी, एलएलएम, एमबीएसारख्या पदवी प्राप्त करुन स्वत:ला सिद्ध केले. सध्या ते पीएचडी करत आहेत. आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या विवेक जोशींना दोनदा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.