बंगळुरू शहरात तयार होतोय हायस्पीड 'हायपरलूप', पाहा व्हिडिओ - बंगळुरू हायपरलूप बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9019677-276-9019677-1601637486538.jpg)
कर्नाटकातील बंगळुरू शहरामध्ये काही दिवसांमध्ये आपल्याला 'हायपरलूप' पहायला मिळणार आहे. केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट ते शहरातील प्रमुख बसस्थानकादरम्यान हा हायपरलूप उभारण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेच्या एका कंपनीशी सहकार्य करार करण्यात आला आहे. यामुळे 40 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर फक्त १० मिनिटांच्या टप्प्यावर येणार आहे. रस्त्याने शहर ते विमानतळ हे अंतर कापण्यास सुमारे दीड तासांचा वेळ लागतो. अमेरिकेतील व्हर्जिन हायपरलूप कंपनी आणि बंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळून या हायपरलूपची निर्मिती करणार आहेत. या प्रकल्पाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
टीप - वरील व्हिडिओत संग्रहित फुटेज आणि संकल्पचित्रांचा समावेश आहे.
टीप - वरील व्हिडिओत संग्रहित फुटेज आणि संकल्पचित्रांचा समावेश आहे.