VIDEO : निर्धास्तपणे फिरत होता विकास दुबे; मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज आले समोर.. - विकास दुबे उज्जैन मंदीर व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
कुख्यात गुंड विकास दुबे हा आज चकमकीमध्ये मारला गेला. ३ जुलैला कानपूरमध्ये झालेल्या चकमकीत आठ पोलिसांना वीरमरण आले होते. यामधील मुख्य आरोपी दुबे तेव्हापासून फरार होता. त्यानंतर उज्जैनमधील एका मंदीरातून त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, दुबे हा या मंदिरात अगदी निर्धास्तपणे फिरत होता. या मंदिरातील त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे...