हॉकीची 'राणी' : सामान्य कुटुंबातल्या हरयाणवी कन्येनं पद्म पुरस्कारासह मिळवलं दिग्गजांच्या पंक्तीत स्थान
🎬 Watch Now: Feature Video
4 डिसेंबर 1994ला हरयाणातील शाहाबादेतील मारकंडा येथे राणीचा जन्म झाला. राममूर्ती आणि रामपाल अशी तिच्या आई-वडिलांचे नाव आहे. रामपाल घोडागाडी चालवून कुटुंब चालवत असत. चौथीत असताना राणीने पहिल्यांदा हॉकी स्टिक हातात पकडली. नातेवाईकांनी अनेकदा विरोध करूनही मुलीच्या हट्टाखातर आई-वडिलांनी तिला खेळण्याची परवानगी दिली. तिचा 13व्या वर्षीच भारतीय महिला हॉकी टीममध्ये घेण्यात आले.