ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचवावे; वंदना चव्हाणांचे सरकारला आवाहन - वंदना चव्हाण राज्य सभा
🎬 Watch Now: Feature Video

ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाइल किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे राज्यात कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. जुलैमध्ये सांगलीतील आदर्श हराळे या दहावीच्या विद्यार्थ्याने याच कारणासाठी आत्महत्या केली होती. ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागामध्ये प्रत्येक १०० व्यक्तींमागे केवळ ३० जणांकडे इंटरनेट सुविधा आहे. एनसीईआरटीच्या आकडेवारीनुसार २७ टक्के विद्यार्थ्यांकडे शिक्षणासाठी मोबाइल, इंटरनेट, टीव्ही किंवा रेडिओ अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वंदना चव्हाण राज्यसभेमध्ये म्हणाल्या.