दोन शेजाऱ्यांची कडाक्याची भांडणं; लोकांनी दोघांची हात घातले उकळत्या तेलात! - dhangadhra viral video
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12470271-thumbnail-3x2-asdd.jpg)
अहमदाबाद - दोन शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये वाद झाल्यानंतर सत्य जाणून घेण्यासाठी त्यांना जीवघेणी परीक्षा द्यावी लागली.परिसरातील लोकांनी शेजारी राहणाऱ्या महिला व पुरुषाला उकळत्या तेलात हात घालण्यास भाग पाडले. ही घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील ध्रांगध्रा तालुक्यातील निमकनगरध्ये घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.दोघांमधील वादात कोण खरे बोलतेय, हे तपासण्यासाठी दोन्ही शेजाऱ्यांना उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितले. घटनेनंतर महिला आणि पुरुष दोघांचेही हात तेलाने भाजले आहेत.दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ईटीव्ही भारत अंधश्रद्धांना समर्थन देत नाही.