VIDEO : काळी वाळू असलेला कर्नाटकातील तिलमटी समुद्रकिनारा! - तिलमटी बीच कर्नाटक
🎬 Watch Now: Feature Video

आपल्यापैकी बऱ्याच जणांना विरंगुळा म्हणून समुद्रकिनारी जायला आवडते. समुद्रकिनारी आपल्याला बहुतांशी पांढरी वाळू आढळते. मात्र, कर्नाटकमध्ये एक असा समुद्रकिनारा आहे, जिथे चक्क काळी वाळू आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील या समुद्रकिनाऱ्याला माजलीचा तिलमटी किनारा म्हटलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावरील काळी वाळू बघून पर्यटक मंत्रमुग्ध होऊन जातात. सागरी विज्ञानाचे एक अभ्यासक सांगतात की, येथे असलेल्या काळ्या खडकांना समुद्रातील लाटा फोडून टाकतात. त्यामुळे येथील वाळूचा रंग काळा आहे.. तिलमटीच्या समुद्रकिनारी सूर्यास्ताचे खूप सुंदर फोटो काढता येतात. इथली चमकणारी काळी वाळू बघणं एक आल्हाददायक अनुभव असतो. वाळूला वेगळा रंग देणाऱ्या खडकांवर पहुडल्यावर या यात्रेचे पैसे वसूल झाल्याचा आनंद मिळतो..