thumbnail

By

Published : Jun 2, 2021, 8:22 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : आरामात रस्त्याच्या मधोमध बसला होता वाघ, इतक्यात मागून आला हत्ती

जंगलात वाघाची दहशत असते. वाघ अतिशय हिंस्र प्राणी आहे. जंगलातील प्रत्येक प्राणी वाघाला घाबरून राहतो. वाघ समोर दिसताच प्रत्येक प्राण्याचा थरकाप उडतो. सर्व प्राण्यात शिकारीमध्ये पटाईत प्राणी हा वाघ आहे. वाघाला पाहताच इतर प्राणी पळ काढतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वाघ आरामात रस्त्याच्या मधोमध आरामशीर बसलेला दिसतो. मात्र, मागून हत्ती आल्याचे दिसताच वाघ त्याला रस्ता मोकळा करून देतो आणि तेथून झाडांमध्ये धावत जातो. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.