नागपूर Nagpur Murder News : नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या (Ambazari Police Station) हद्दीतील असलेल्या पांढराबोडीच्या सुदाम नगरीत तिघांनी संगनमत करून एका तरुणाची निर्घृण हत्या (Murder) केलीय. सागर नकुल नागले उर्फ टूनां (२७) असं मृत तरुणाचं नाव आहे. अजित संतन नेताम आणि सुरेश मनोहर यादव असे आरोपीचे नावे आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आलीय.
अशी घडली घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी आणि मयत हे घरात दारू पीत बसले होते. मृतकाने आरोपीच्या मामे बहिणींशी अफेअर असल्याचं सांगितलं. त्यामुळं आरोपीला प्रचंड अनावर आला. आरोपीने कुणाला काहीही कळण्यापूर्वी सोप्याखाली ठेवलेला सिमेंटचा गट्टू सागरच्या डोक्यात मारला. त्यामुळं सागर जागीच कोसळला. ज्यावेळी आरोपीनं सागरच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला त्यानंतर त्याचे मित्र अजित आणि सुरेश यांनी सुद्धा सागरला मारहाण केल्यानं सागरचा जागीचं मृत्यू झाला.
तीनही आरोपी अटक, एक अल्पवयीन? : घटनेची माहिती समजताचं अंबाझरी पोलिसांनी लगेच घटनास्थळी दीखल झाले. घटनास्थळाच पंचनामा केल्यानंतर सागर उर्फ टूनां यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून आरोपींचा शोध सुरू केला. अवघ्या काही मिनिटांमध्ये तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित संतन नेताम आणि सुरेश मनोहर यादव यांचा समावेश असून तिसरा आरोपी सज्ञान आहे की, अल्पवयीन या संदर्भात शहानिशा केली जात आहे.
परिसरात बंदोबस्त तैनात, शांतता : सागरची हत्या झाल्याचं समजल्यानंतर सुदाम नगरी परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी परीसरात बंदोबस्त तैनात केलाय. सध्या या भागात शांतता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक बोल्हे यांनी दिली.
हेही वाचा -