Aditi Tatkare Resolution 2022 : 'यापुढेही उद्योग विभाग जोमानेच कार्य करणार' - राज्य उद्योगमंत्री आदिती तटकरे यांचा नवीन वर्षे संकल्प
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोना काळात न थांबलेला कुठला विभाग असेल तर तो उद्योग विभाग होता. कोरोनामध्ये उद्योग विभाग जोमाने कार्यरत होता. २ लाख कोटींचे सामंजस्य करार या दरम्यान मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये विदेशी किंवा देशातील उद्योग यांचा समावेश असून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करणे हा या मागचा उद्देश होता. याचा फायदा महाराष्ट्राला नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. मागील २ वर्षांमध्ये मागील सर्वात जास्त फटका बसला असेल किंवा जो विभाग सर्वात उशिरा कार्यरत झाला असेल तर तो पर्यटन विभाग आहे. पर्यटन विभाग २ वर्षांमध्ये पूर्णपणे ठप्प होता. परंतु येणाऱ्या वर्षात हाच विभाग मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत राहणार असून पर्यटन व्यवसायाला पुढे नेण्याचा संकल्प असणार आहे. त्यासाठी पर्यटनस्थळी विशेष सुविधा उपलब्ध करून देश विदेशातील पर्यटकांना योग्य सोयी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, अशी भावना राज्य उद्योगमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे.