मृतात्म्यांना मोक्षप्राप्ती करून देणारा अवलिया - चंडीगड पोलीस अधिकारी अस्थिविसर्जन व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - जेव्हा या जगाचा कुणी निरोप घेते तेव्हा त्याचे कुटुंबिय पूर्ण रुढी आणि परंपरेनं त्यांचे अंत्यविधी करतात. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे, की जर मृत व्यक्तिचा अंत्यविधी झाला नाही तर त्याला मोक्षप्राप्ती होत नाही. चंडीगडमधील निवृत्त पोलीस अधिकारी, श्यामलाल यांनी जगाचा निरोप घेतलेल्या लोकांना मोक्षप्राप्ती करून देण्यासाठी आपल्या आयुष्यातील २५ वर्षे घालवली आहेत आणि अजूनही हे काम सुरू आहे. त्यांनी २५ वर्षात जवळ ३० हजार लोकांच्या अस्थिंचे हरिद्वारमध्ये विर्सजन केले आहे.