वयाच्या ६२व्या वर्षी सायकलवरून दूध विक्री करणाऱ्या 'शीला आत्त्या' - शीला देवी दूध विक्री व्यवसाय
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - कासगंज जिल्ह्यातील खेडा गावात राहणारी एक वयोवृद्ध महिला स्त्री सशक्तीकरणाचे जिवंत उदाहरण आहे. लग्नाच्या एकाच वर्षात शीला देवींच्या पतीचे निधन झाले. मात्र, त्यांनी हिंमत न हारता शेती आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. गेल्या २२ वर्षापासून त्या सायकलवरून गावागावात दूध विकण्याचे काम करत आहेत. सध्या त्यांचे वय ६२ आहे. या वयातही त्या आत्मनिर्भर आहेत. गावात त्यांना सगळे प्रेमाने शीला आत्या म्हणून ओळतात.