मुंबईजवळच्या समुद्रात अडकलेल्यांना वाचविण्याचा थरारक व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : बार्ज पी३०५ या हिरा ऑइल फिल्ड्सच्या परिसरात लोकांना वाचवण्यासाठी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' रात्रीपासून मेहनत घेत आहेत. या दोन्ही बोटींवरील पथकांनी सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत ६० लोकांना वाचवले होते. त्यानंतर 'एनर्जी स्टार' आणि 'अहल्या' जहाजानेही या बचावकार्यात सहभाग घेतला. मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत १३२ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली होती. त्यानंतर दुपारपर्यंत एकूण १७७ जणांना वाचवण्यात आले आहे. इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे 'गॅल कन्स्ट्रक्टर' हे जहाज वादळाच्या तीव्रतेने समुद्रात वाहून गेले होते. या जहाजावर एकूण १३७ लोक होते. अजूनही बाकी लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाहा या बचावकार्याचा व्हिडिओ...
Last Updated : May 19, 2021, 11:22 AM IST