VIDEO : पळा पळा... ड्रोन आला! पहा केरळ पोलिसांचा मजेशीर व्हिडिओ.. - लॉकडाऊन केरळ पोलीस व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
तिरुवअनंतपुरम - देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कित्येक ठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात येत आहे. मात्र, अशा लोकांवर लक्ष ठेवता ठेवता पोलिसांना नाकीनऊ येत आहे. केरळ पोलिसांनी मात्र यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील पोलिस सध्या ड्रोनच्या साहाय्याने लोकांच्या जमावांवर नजर ठेवत आहेत. हा ड्रोन पाहताच, मोकळ्या मैदानांमध्ये एकत्र खेळत असलेले तरुण, गावातील कट्ट्यावर रिकामटेकडी बसलेली मंडळी या सगळ्यांची तारांबळ उडत आहे. या सर्वांचा मजेशीर व्हिडिओ केरळ पोलिसांनी आता प्रसिद्ध केला आहे...