Sacrilege Attempt At Golden Temple : केंद्राकडून स्वतंत्र चौकशी व्हावी- पंजाबच्या विरोधी पक्षनेत्यांनी मागणी - Sacrilege Attempt At Golden Temple
🎬 Watch Now: Feature Video
चंदीगड - अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात चुकीचे कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ( Attempt to Desecration of the Guru Granth Sahib ) तरुणाची हत्या झाली. त्यावर पंजाबमधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते मनजिंदर सिंग सिरसा ( Manjinder Singh Sirsa on golden temple incident ) म्हणाले, की ही अत्यंत वाईट घटना आहे. अशा घटनांमागे षड्यंत्र आहे. काही दिवसांपूर्वी असे चुकीचे कृत्य करण्याची घटना समोर आली होती. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. शाह यांनी दु:ख व्यक्त ( Amit Shah expressed sorrow on temple incident ) केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या स्वतंत्र संस्थेकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल ( former Punjab Minister Punjab Singh Badal ) यांनी केली आहे.
TAGGED:
golden temple Amritsar