विहिरीतून बादल्यांनी काढलं पेट्रोल; सौदीमधील नव्हे तर कर्नाटकातील प्रकार
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू- कर्नाटक राज्यातील कारवार जिल्ह्यात एका विहिरीतून अचानक पेट्रोल निघायला लागले. त्यामुळे विहीर मालक आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. मागील एक आठवड्यापासून कुटुंबीयांना विहिरीतून पेट्रोलचा वास येत होता. मात्र, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. मात्र, नंतर त्यांना विहिरीतील पाण्याचा रंग लाल दिसायला लागला. त्यानंतर पाणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले. तेव्हा विहिरीमध्ये पेट्रोल असल्याचे स्पष्ट झाले. जवळील एका पेट्रोल पंपाची टाकी लिक झाल्याने विहीरीमध्ये पेट्रोल येत असल्याचे समजल्यावर या गोष्टीचा उलगडा झाला. तोपर्यंत, पेट्रोलची खाण सापडली की काय, असेच सर्वांना वाटत होते.