हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट: ..जेव्हा चिमुरडी मृत वडिलांना फोन लावते - Father dies of covid
🎬 Watch Now: Feature Video
शिवमोगा (कर्नाटक) - ही एक हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट आहे. तीन वर्षांच्या सौम्याने आपल्या आईला एक वर्षांची असतानाच गमावले. आता कोरोनामुळे तिने वडिलांनाही गमावले आहे. वडिलांच्या मृत्यूबद्दल माहिती नसल्यामुळे सौम्या रोज नियमीतमणे वडिलांच्या मोबाइलवर फोन लावते. छोट्या मुलीला असे बोलताना पाहून आपल्या भावनांना रोखणे अशक्य आहे. आता सौम्याची काळजी तिची आत्या घेते.
कोविड महामारीचा प्रत्येकाच्या जीवनावर काहीना-काही परिणाम झाला आहे. या प्राणघातक विषाणूने सर्वांचा आनंद हिरावून घेतला आहे. कोविडमुळे त्यांचे पालक गमावल्यानंतर बरीच मुले अनाथ झाली आहेत. तसेच, येथे एक लहान मुलगी नियमितपणे तिच्या मृत वडिलांना फोन करते. कोविडमुळे वडिलांच्या मृत्यूविषयी तिला काहीही माहिती नाही.