गर्भवतीला स्ट्रेचरवर ठेवून नदी ओलांडत त्यांनी कापले ५ किमी अंतर, आरोग्य कर्मचाऱ्यांची कसरत - आरोग्य विभाग ओरिसा
🎬 Watch Now: Feature Video
भुवनेश्वर - रस्ता नसल्यामुळे ओडिशातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आरोग्य विभागाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी एका गर्भवती महिलेला ५ किमी अंतर स्ट्रेचरवर ठेवून पायी प्रवास करावा लागला. या मार्गात त्यांनी २ नद्याही पार केल्या. रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावात पोहचू शकत नसल्याने त्यांना हे अवघड काम करावे लागले. नमीदा देहुरी आणि पौर्णिमा मोहानत असे आरोग्य सेविकांचे नाव आहे. त्यांनी गावातील काही लोकांच्या मदतीने हे काम केले. आरोग्य सेविकांनी केलेल्या अवघड कामामुळे परिसरात त्यांचे कौतूक होत आहे.