'पैसे नही दुआ देना', हैदरबादच्या मोहम्मद हनिफ यांचे कौतुकास्पद कार्य - हैदराबाद रुग्णांसाठी मोफत रिक्षा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - या जगात पैसे आज आहेत तर उद्या नाही. पण एखाद्याने दिलेले आशीर्वाद मात्र, आपल्या सोबतच असतात, असा संदेश देत हैदराबाद येथील 84 वर्षीय मोहम्मद हनीफ हे रुग्णांना मोफत रुग्णालयात नेण्याचे काम करत आहेत. मागील तीन वर्षांपासून ते दररोज किमान दहा रुग्णांना रुग्णालयात पोहोचवितात त्या बदल्यात पैसे नको सायकलीवर जेरुसलेमला जाण्याासठी दुआ द्या, असे म्हणतात.