कायगावमधील शेतकऱ्याने साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी थेट संवाद - कायगाव शेतकरी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12612782-470-12612782-1627565122208.jpg)
गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील परिस्थितीला हतबल झालेल्या शेतकऱ्याने फेसबुक लाइव्हद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'खेत की बात' यामाध्यमातून संवाद साधत आपली व्यथा मांडली. शेतातून फेसबुक लाइव्ह करत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतातील तज्ज्ञ आणि माहितीगार असलेल्या संसदेत संधी द्यायला हवी, असही ते म्हणाले आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, मात्र त्या तुलनेत शेतमालाच्या भावात नगण्य वाढ दिसली आहे. शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न या शेतकऱ्याने विचारले आहे. भाऊसाहेब शेळके असे या शेतकऱ्याचे नाव आहे.