झारखंडमधील 'देवघर' बनतोय सायबर क्राईमचा नवीन अड्डा - देवघर जिल्हा सायबर क्राईम व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - झारखंडमधील जामताडा या जिल्ह्याला जगभरात ओळखले जाते. ही जागा इतकी भयंकर अन् कुख्यात आहे की, यावर एक वेब सीरिजसुद्धा बनली आहे. देशात कुठेही मोठा सायबर क्राईम झाला तर, त्याचे काही ना काही कनेक्शन जामताडा सोबत जुळते. आता झारखंडमधील देवघर जिल्हा 'जामताडा पार्ट टू' होताना दिसत आहे. हे शहर सायबर क्राईमचा नवीन अड्डा होत आहे. गेल्या वर्षात 87 सायबर क्राईमचे गुन्हे दाखल झालेत तर 372 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.