दार्जिलिंगमधील ही 'टॉय ट्रेन' पुन्हा रुळांवर येण्याच्या प्रतिक्षेत.. - दार्जिलिंग टॉय ट्रेन लॉकडाऊन
🎬 Watch Now: Feature Video
आपण जेव्हा 'टॉय ट्रेन'चं नाव ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे दार्जिलिंगच्या डोंगर दऱ्यातून जाणारी जॉय राईड! सुंदर डोंगर आणि छोट्या भुसुरुंगातून जाताना निसर्गाचं विहंगम रुप बघून मनाला एक समाधान मिळतं. ही टॉय ट्रेन फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही, तर देशातील इतर भागातही प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे नॉर्थ बंगालसह राज्यातील पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळं, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या या रेल्वे लाइनवर गेल्या एक वर्षापासून शांतता आहे. ही ट्रेन सुरू रहावी, याकरिता रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याची योग्य ती काळजी घेतली जात आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच, ती पुन्हा सुरू करता येईल. पाहा, ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट..