शेतकऱ्यांचे हाल करून कोणतेच सरकार चालू शकत नाही; चौधरी बीरेंद्र सिंहांचा भाजपला घरचा आहेर - भाजप नेते चौधरी बीरेंद्र सिंह ईटीव्ही मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10672948-thumbnail-3x2-farm.jpg)
हैदराबाद - कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या दरम्यान सरकारसोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या. मात्र, कृषी कायद्याविरोधातील आंदोलकांचे समाधान होऊ शकलेले नाही. याच मुद्यावर ईटीव्ही भारतने माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेता चौधरी बीरेंद्र सिंह यांच्यासोबत विशेष बातचीत केली आहे. शेतकऱ्यांचे हाल आणि अवहेलना करून कोणतेच सरकार चालू शकत नाही, असे बीरेंद्र सिंह म्हणाले. मोदी सरकारने या कायद्यांचा फेरविचार करावा असेही ते म्हणाले.चौधरी बीरेंद्र सिंह यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या वरिष्ठ पत्रकार अनामिका रत्ना यांनी...