CDS Bipin Rawat Asthi Visarjan : हरिद्वारमध्ये बिपिन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्या अस्थिकलशाचे मुलींनी केले विसर्जन - हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपिन रावत मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
हरिद्वार - तामिळनाडू हेलिकॉप्टर (Helicopter Crash) दुर्घटनेत मृत्यू झालेले सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थी (Bipin Rawat Asthi Visarjan) शनिवारी हरिद्वार (Haridwar) येथील गंगेत विसर्जित करण्यात आल्या. रावत यांच्या दोन्ही मुलींनी आई-वडिलांच्या अस्थिकलशाचे विसर्जन केले. जनरल रावत आणि मधुलिका रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनी आज सकाळी दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीतून अस्थी गोळा केल्या. दिल्लीहून लष्कराचे एक विमान सीडीएस जनरल रावत यांच्या अस्थी घेऊन जॉली ग्रँटसाठी रवाना झाले. जॉली ग्रँट विमान तळावरून रस्त्याने अस्थिकलश हरिद्वार येथे आणले. व्हीआयपी घाटावर वैदिक मंत्रोच्चारात त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. त्यासाठी लष्कराच्या तुकडीसह बँड पथक घाटावर पोहोचले होते.