VIDEO: उत्तराखंडमध्ये मुसळाधार पाऊस....पाहा दरड कोसळतानाचा व्हिडिओ - रुद्रप्रयाग दरड कोसळल्याची घटना
🎬 Watch Now: Feature Video

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरडी कोसळल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. तसेच वाहनचालकांसाठी गाड्या चालवणं अवघड होऊन बसले आहे. मदमहेश्वर धामला जोडणाऱ्या ऊखीमठ - रांसी मार्गावर मोठी दरड कोसळली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.