खासदार प्रज्ञा सिंह यांचा डान्स पाहिला का? लग्न समारंभात लगावले ठुमके - खासदार प्रज्ञा सिंह लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असणाऱ्या खासदार प्रज्ञा सिंह यांनी एका गरीब कुटुंबातील दोन मुलींचा विवाह लावून दिला आहे. चंचल आणि संध्या असे त्या दोन मुलींचे नाव आहे. प्रज्ञा सिंह यांच्या निवासस्थानी लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. मी आनंदाने घरातून दोन्ही मुलींची पाठवणी करत आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्या भावनीक झाल्या. लग्न समारंभात महिला डान्स करत असताना पाहून त्या नाचण्यापासून स्वत: ला रोखू शकल्या नाही. प्रज्ञा यांनीही त्याच्यासोबत ताल धरला आणि 'ठुमके'ही लगावले.