'हैदराबाद महानगरपालिका निवडणूक जिंकून दाखवावी' ओवैसींचे थेट मोदींना आव्हान - खासदार असदुद्दीन ओवैसी यांची मोदींवर टीका
🎬 Watch Now: Feature Video

हैदराबाद - हैदराबाद शहराच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे. भाजप आणि एमआयएम पक्षाच्या सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान दिले आहे. मंत्र्यांना पाठवण्याऐवजी हैदराबादमध्ये मोदींना प्रचार करावा आणि निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान ओवैसी यांनी मोदींना दिले. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणूक 1 डिसेंबरला होणार आहे.