हवा शुद्ध करणारे फिल्टर; हुबळीतील माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम - air purifiers in Hubli news
🎬 Watch Now: Feature Video
दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरीकरणामुळे प्रदुषणाची समस्या आपल्या समोर उभी आहे. प्रदूषित हवेमुळे मानवासह इतर सजीवांचे जीवनही संकटात सापडले आहे. हीच समस्या लक्षात घेत वायू प्रदुषणावर नियंत्रणासाठी हुबळीतील काही माजी विद्यार्थ्यांनी हवा शुद्ध करणारे फिल्टर तयार केले आहे. चाचणी केल्यानंतर हे युनिट सध्या हुबळी शहरात लावण्यात आले आहे. या माजी विद्यार्थ्यांच्या गटाने यापूर्वीही शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. आता शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.