चुकीच्या दिशेने येत कारची धडक; पाहा, व्हिडिओ - car collided in wrong route hyderabad
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11883153-thumbnail-3x2-kkk.jpg)
हैदराबाद - येथील गच्चीबौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौलीडोड्डी याठिकाणी कार अपघात झाला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका महिंद्रा कारने रस्त्यावरील दुसऱ्या बाजूने येणाऱ्या फोर्चुनरला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वजण सुरक्षित आहेत. या अपघातानंतर सायबराबाद वाहतूक पोलिसांनी या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज ट्विटरवर पोस्ट केला आहे. बेजबाबदार पणाने ड्रायव्हिंग करणे दुर्दैवी आहे, या शब्दात त्यांनी या अपघाताचे वर्णन केले. दरम्यान, या घटनेप्रकरणी 21 तारखेला महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.