60 वर्षांपासून 'चहासह कॉलेजच्या आठवणींचा गोडवा जोपासणारी भावंडे'
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - आज आपल्याला फार कमी ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळते. असेच एकत्र कुटुंब पद्धतीचं एक उदाहरण पंजाबच्या लुधियानामध्ये पाहायला मिळते. पंजाब कृषी विद्यापीठाबाहेर सुरजीत सिंह आणि सुखदेव सिंह या दोघांनी 60 वर्षापूर्वी चहाचे दुकान सुरू केले होते. हेच दुकान आज त्यांची दुसरी पिढी सांभाळत आहे. आजही या विद्यापीठातील माजी विद्यार्थी जेव्हा घरी येतात. तेव्हा ते या दुकानाला भेट देतात आणि चहासह पराठ्यांचा आस्वादही घेतात. आणि आपल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा देतात.